भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिकें धरिला चांगोबाच हात । तंवा सकळ संता कळवळती

pundaliken dharila changobach hat | tanva sakal santa kalavalati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुंडलिकें धरिला चांगोबाच हात । तंवा सकळ संता कळवळती ॥१॥ पताकांचे भार समाधि भोंवते । तेव्हां साधुसंत उठावले ॥२॥ यांच्या या ज्ञानाचा अंतपार नाहीं । भली मुक्ताई ओसंडली ॥३॥ संतसमागम फळला तुजला । एकांत फवला मुक्त्ताई ॥४॥ मसुरेप्रमाणें दावियेली खूण । तेंचि पूर्ण ब्रह्म योगियाचें ॥५॥ फार दिवस तुम्हीं रक्षिलें शरीर । मुक्ताईनें पार उतरिलें ॥६॥ नामा म्हणे देवा सद्‌गुरुचा महिमा । बाप पूर्ण आम्हां पांडुरंग ॥७॥