भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलीकालागुनी ह्मणे पांडुरंग । सखा जीवलग तूंची माझा

pundalikalaguni hmane pandurang | sakha jivalag tunchi majha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुंडलीकालागुनी ह्मणे पांडुरंग । सखा जीवलग तूंची माझा ॥१॥ न पाहासी वास बोलसी उदास । सांडोनियां आस सर्व-स्वाची ॥२॥ वैकुंठ सोडोनी आलों तुजपाशीं । कां गा न बोलसी भक्तराया ॥३॥ पितृभजनाचा झालासी अधिकारी । केली बा पायरी वैकुंठासी ॥४॥ भाग बापा कांहीं आवडे तें घेंई । मज वाटतें ह्लदयीं घालावाची ॥५॥ नामा म्हणे देवा स्वामि मुगुटमणी । उभा कर ठेवुनी कटीवरी ॥६॥