भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिकाचे भेटीं आणि भींवरेचे तटीं । परब्रह्म उभें वाळुवंटीं मायें

pundalikache bhetin ani bhinvareche tatin | parabrahma ubhen valuvantin mayen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुंडलिकाचे भेटीं आणि भींवरेचे तटीं । परब्रह्म उभें वाळुवंटीं मायें ॥१॥ उभा वीटेवरी कर ठेवूनि कटावरी । उभा भीमातीरीं जगजेठी गे माय ॥२॥ विठ्ठल कान्हा चरणीं वांकी तोडर । कासे पीतांबार पदकलीळा मनोहर गे माय ॥३॥ कान्हा विठ्ठल कान्हा प्रसन्नवदन थोरा । जो आथी करुणाकरा हरि नामया दातारा ॥४॥