भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजियेली तापी पूजिला सोमेश्वर । उठावले भार वैष्णवांचे

pujiyeli tapi pujila someshvar | uthavale bhar vaishnavanche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूजियेली तापी पूजिला सोमेश्वर । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ कांहीं कोणावरी नाहीं पडलें ओझें । कष्टी निवृत्तिराज होत असे ॥२॥ आली गेली कैसी आम्हां कळलें नाहीं । कोठें मुक्ताई विसर्जिली ॥३॥ नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वरा । निवृत्तीचें करा समाधान ॥४॥