भजनी मालिका
← भजनांकडे परत

पृथ्वी अवघीं लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार

pruthvi avaghin lingakar | avagha lingacha vistar

रचनाकार: संत रामदास · अभंग
पृथ्वी अवघीं लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार ।। आतां कोठें ठेवूं पाव । जेथे तेथे महादेव ।। अवघा रुद्रची व्यापिला ।ऐसे देवचि बोलिला ।। दासे जाणोनिया भला ।देह देवार्पण केला।।