भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रारब्धाच्या बळे देहाचें वर्तनें । काळचक्र भोवने जैसें कांहीं

prarabdhachya bale dehachen vartanen | kalachakra bhovane jaisen kanhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रारब्धाच्या बळे देहाचें वर्तनें । काळचक्र भोवने जैसें कांहीं ॥१॥ तैसाची तो साधु जाणावा प्रसिद्धु । देहाचा संबंधु नेणे कांहीं ॥२॥ वारे वाजूनियां जातां वृक्ष डोले । मर्यादेवेगळें होत जाय ॥३॥ नामा म्हणे होणें जाणें नाहीं तयां । संचिता साराया लागोनियां ॥४॥