भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव

potin ahantesi thav | jivhe sakal shastrancha sarav

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥१॥ भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥ सजि-वासी हाणी लाथा । निर्जिवपायीं ठेवी माथा ॥३॥ सजीव तुळसी तोडा । पूजा निर्जिव दगडा ॥४॥ वेला करी तोडातोडी । शिवा लाखोली रोकडी ॥५॥ तोंड धरून मेंढा तारा । म्हणति सोमयाग करा ॥६॥ सिंदूर माखूनियां धोंडा । त्यासि भजती पोरेंरांडा ॥७॥ अग्निहोत्राचा सुकळ । कुश पिंपळाचा काळ ॥८। एत्तिकेची पूजा नाना । जित्या नागा घेती डांगा ॥९॥ नामा ह्मणे अवघें खोटें । एक हरिनाम गोमर्टे ॥१०॥