भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोट भरूनी व्यालासी । मज सांडुनी कोठें जासी

pot bharuni vyalasi | maj sanduni kothen jasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पोट भरूनी व्यालासी । मज सांडुनी कोठें जासी ॥१॥ धिरा धिरा पांडुरंगा । मज कां टाकिलें नि:संगा ॥२॥ ज्याचा जार त्यासी भार । मजला नाहीं आणिक थार ॥३॥ विठाबाई मायबहिणी । तुझे कृपें तरली जनी ॥४॥