भजनी मालिका
← भजनांकडे परत

पितयाची भक्ति पुंडलीकें केली । मात हे ऐकिली देव-रायें

pitayachi bhakti pundaliken keli | mat he aikili dev-rayen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पितयाची भक्ति पुंडलीकें केली । मात हे ऐकिली देव-रायें ॥१॥ नवलक्ष गोधनें पांचसें सवंगडे । रामकृष्ण पुढें चालताती ॥२॥ उठा चला जावों पुंडलीक पाहों । देव ह्मणे भावो पाहों त्याचा ॥३॥ गोकुळींहूनि देव पंढरपुरा पातला । त्वरित पावला वेणुनादीं ॥४॥ तेथूनि परतला बाळुवंटीं आला । तंव देव देखिला पुंडलीकें ॥५॥ देव उभा आहे पुंडलीक पाहे । चतुर्भूज स्वयें देखियेला ॥६॥ देखियेले हरि शंख चक करीं । आयुधें तीं चारी झळकती ॥७॥ चतुर्भूज मूर्ति देखियेली दृष्टी । पुंढलिकें ईट टाकियेली ॥८॥ इटेवरी उभा राहिला विठ्ठल । ठसा मिरवला त्रिभुवनीं ॥९॥ पुंडलिक भाव पाहूं आला देव । प्रसन्न झाले सर्व पुंडलीका ॥१०॥ वैकुंठ कैलास आणिल हा येथें । नामा म्हणे हित झालें आह्मां ॥११॥