भजनी मालिका
← भजनांकडे परत

फार आठवतें निवृत्तीचे चित्तीं । सोपान स्फुंदती मुक्ताबाई

phar athavaten nivruttiche chittin | sopan sphundati muktabai

रचनाकार: संत नामदेव · अभंग
फार आठवतें निवृत्तीचे चित्तीं । सोपान स्फुंदती मुक्ताबाई ॥१॥ आम्हां माता पिता नित्य ज्ञानेश्वर । नाहीं आतां थार विश्रांतीसी ॥२॥ छळिलें ब्राह्मणें प्रतिष्ठानीं जातां । रेड्यामुखीं वेदांता बोलविलें ॥३॥ आला चांगदेव व्याघ्र वहान घेऊन । नेला अभिमान ज्ञानदेवें ॥४॥ नाना प्रकारचे आठविती शब्द । नामा म्हणे बोध भाविकाला ॥५॥