भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाटावरी बैसविती । गोपी अक्षवाणें करिती

patavari baisaviti | gopi akshavanen kariti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाटावरी बैसविती । गोपी अक्षवाणें करिती ॥१॥ ब्रह्मादिक न देखती माथा । त्यासीं लविती अक्षता ॥२॥ नव्हे प्राकृत बाळक । परस्परें म्हणती लोक ॥३॥ ध्वज वज्रांकुश चिन्हा । आला वैकुंठींचा राणा ॥४॥ येती वेळोवेळां । नामा ह्मणे पाहाती डोळां ॥५॥