भजनी मालिका
← भजनांकडे परत

पर्वतप्राय पापराशी होती दग्ध । वाचेसी मुकुंद उच्चारितां

parvatapray paparashi hoti dagdha | vachesi mukund uchcharitan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पर्वतप्राय पापराशी होती दग्ध । वाचेसी मुकुंद उच्चारितां ॥१॥ अच्युत श्रीहरी केशव नरहरी । माधव हरहरी रामकृष्ण ॥२॥ नामाचें साधन करशील पूर्ण । तें प्रपंचाचें भान उरों नेदी ॥३॥ उदासीन वृत्ति आचरावें कर्म । नाहीं देहधर्म गुण माया ॥४॥ ऐसा हा अनकळित मार्ग साधेल तुज । खेचर विसा गुज सांगे नाम्या ॥५॥