भजनी मालिका
← भजनांकडे परत

परियेसी वासने संकल्प स्वरूपे । विश्वव त्वां आटोपें वश केलें

pariyesi vasane sankalpa svarupe | vishvav tvan atopen vash kelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परियेसी वासने संकल्प स्वरूपे । विश्वव त्वां आटोपें वश केलें ॥१॥ ब्रह्मादिक तुझे इच्छेचें खेळणें । विषयाकारणें लोलिंगता ॥२॥ परि माझ्या मना सांडी वो समर्थें । देईं मज दीनातें कृपादान ॥३॥ वेदशास्त्रवक्ते वित्पन्न थोरले । तृणापरीस केले ह्ळुवट ॥४॥ कृपणाचे द्वारीं होऊनि याचक । विसरले सुख आत्महित ॥५॥ एके अभिमानें भ्रांत जालें चित्त । भजती इंद्रियातेम दीनरूपें ॥६॥ शब्द स्पर्श रूप रसगंधे फांसा । गुंतले दुराशा तळमळित ॥७॥ येकातें लाविला पुत्र कलत्र धंदा । नेणती ते कदा सुखगोष्टी ॥८॥ जन्म मरणांचे जुपियले पांतीं । आकल्प भोगिती नाना योनी ॥९॥ ऐसे तुझे संगें बहु जालो हिंपुटी । पाडिली तुटी संतसंगा ॥१०॥ नामा म्हणे पुढती गांजिसील मज । येईल केशिराज सोडवणें ॥११॥