भजनी मालिका
← भजनांकडे परत

पारधी तो झड घालोनी पातला । घालावया घाला एकसरें

paradhi to jhad ghaloni patala | ghalavaya ghala ekasaren

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पारधी तो झड घालोनी पातला । घालावया घाला एकसरें ॥१॥ भयाभीत झालीं पांचही ते काळीं । वासना गुंतली एकमेकां ॥२॥ वडील कुरंगी येऊनि त्यापाशीं । लागोनी पायांसी काय बोले ॥३॥ नको मारूं पति तृषेनें पीडिला । मारी तूं मजला तया आधीं ॥४॥ आहेवपणानें धाडी स्वर्गलोका । येतुल्यानें सुखा पात्र होऊं ॥५॥ इतुकीयामाजी दुसरीही आली । ती ह्मणे उगली थांब आतां ॥६॥ तृषेनें पीदिलों पाजीं आधीं पाणी । मन जैसें मनीं तैसें करीं ॥७॥ नामा ह्मणे भिल्ल विसरला घात । राहिला निवांत त्यांच्या बोलें ॥८॥