भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाप्या नावडे संतसंगति । लोभिया नावडे उदारवृति । व्व्यभिचारिणी नावडे पति । नावडे ज्योति उजियेडा

papya navade santasangati | lobhiya navade udaravruti | vvyabhicharini navade pati | navade jyoti ujiyeda

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाप्या नावडे संतसंगति । लोभिया नावडे उदारवृति । व्व्यभिचारिणी नावडे पति । नावडे ज्योति उजियेडा ॥१॥ चांदणें नाचडे तया चोरां । सावधान नावडे तया हेरां । सद्‍बुद्धि नावडे रांडपोरा । सत्य कुचरां आवडेना ॥२॥ तीर्थ नावडे तया दुष्टां । न्याय नावडे सत्य नष्टां । कवण नावडे तया पापिष्ठां । अभिमान नष्टां न सांडवे ॥३॥ भक्ति नावडे तया खळां । पुण्य नावडे तया चांडाळां । देखत देखत जन आंधळा । कांरे घननीळा विसरलेती ॥४॥ पारखी नावडे तया खोटयांला । स्नान नावडे तया विटाळां । सुसंग नावडे नाठाळां । न्याय तंटाळा नावडे ॥५॥ धर्म नावडे तया कृपणां । शुद्धि नावडे दुर्जनां । कर्म नावडे अब्राह्मणां । ऐसी दुष्त वासना पापियातें ॥६॥ नाम नावडे तया नष्ट भक्तां । वृत्त नावडे तयां सर्वथा । नावडे भजन कैची कथा । नाहीं पतिव्रता कलियुगीं ॥७॥ ऐसा झाला कलीचा प्रवेश । धरा नामाचा विश्वास । जीवीं धरा ह्लषीकेश । विष्णुदास नामा म्हणे ॥८॥