भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचा राजा उभा भक्तकाजा । उभारुनि भुजा वाट पाहे

pandharicha raja ubha bhaktakaja | ubharuni bhuja vat pahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा । उभारुनि भुजा वाट पाहे ॥१॥ घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक । साधनें आणिक करुं नका ॥२॥ मनाचेनि मनें ह्रदयीं मज धरा । वाचेनें उच्चारा नाम माझें ॥३॥ बोलोनियां ऐसा उभा भीमातीरीं । नामा निरंतरी चरनापाशीं ॥४॥