भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडव भाग्याची वर्णावया थोरी । शेषाची वैखरी न वर्णवे

pandav bhagyachi varnavaya thori | sheshachi vaikhari na varnave

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पांडव भाग्याची वर्णावया थोरी । शेषाची वैखरी न वर्णवे ॥१॥ पीतांबर कास घालूनि वनमाळी । काढी उष्टावळी आवडीनें ॥२॥ विधीचा जनक रमा ज्यची दासी । ध्यान अह-र्निशीं करी शिव ॥३॥ रोमीं जयाचे ब्रह्माडें अनंत । चारी बेदां अंत न कळे ज्याचा ॥४॥ नामा ह्मणे राबे भक्तांचिये घरीं । भाव देखोनि हरि भुलतसे ॥५॥