भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचशतामाजी दोघी पतिव्रता । जारणी सर्वथा सर्व कांहीं

panchashatamaji doghi pativrata | jarani sarvatha sarva kanhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंचशतामाजी दोघी पतिव्रता । जारणी सर्वथा सर्व कांहीं ॥१॥ करुनियां ऐसीं जाती नरकासी । नांडिलें पतीसी त्यांच्या पापें ॥२॥ करिती एक वेळ झांकिती लोचन । शेवटीं बंधन यमाहातीं ॥३॥ नामा ह्मणे बरें नव्हे हे कोणासी । घडेल तयासी जाच बहू ॥४॥