भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन । वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक

pahatil granth sabhashreshtha mahajan | vaidik shastradnya punyashlok

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन । वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक ॥१॥ देहान्त प्रायश्चित्त असे या बोलिलें । विचारुनि भलें हित करा ॥२॥ म्हणती द्विजवर आणिक नाहीं उपाव । संस्कारें देह करा शुद्ध ॥३॥ श्रीपाद म्हणती अवश्य करीन । देह हे दंडीन अनुतापें ॥४॥ त्रिवेणी संगमीं घालीन कर्वती । गेला पूर्वस्थिती वीतरागेम ॥५॥ दारापुत्रगृह त्यजुनी निघाला । नमस्कार केला द्विजवृंदा ॥६॥ झडझडां जाती परतोनी न पाहती । नाहीं पुनरावृत्ति म्हणती द्विज ॥७॥ त्याग आणि वैराग्य हेंचि प्रायश्चित्त । मग जाला शुचिर्भूत गुरुकृपें ॥८॥ निवृत्ती म्हणती आम्हां कवण गती । सांगावे श्रीमंती विचारुनी ॥९॥