भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां तुझे चरण हरली भवव्यथा । पुढतीं एक चिंता वाटतसे

pahatan tujhe charan harali bhavavyatha | pudhatin ek chinta vatatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाहतां तुझे चरण हरली भवव्यथा । पुढतीं एक चिंता वाटतसे ॥१॥ झणीं मुक्तिपद देसी पांडुरंगा । मग या संतसंगा कोठें पाहूं ॥२॥ मग हे पंढरी आनंद सोहळा । कवणाचे डोळां पाहूं देवा ॥३॥ मग हे हरिकथा अमृत संजीवनी । कवणाचे श्रवणीं ऐकों देवा ॥४॥ नामा म्हणे मज पंढरीची सोये । अनंत जन्म होये याचिलागीं ॥५॥