भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाचारिलें ध्रुवाजवळी त्या रायानें । जाणोनी सन्मानें आला पाशीं

pacharilen dhruvajavali tya rayanen | janoni sanmanen ala pashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाचारिलें ध्रुवाजवळी त्या रायानें । जाणोनी सन्मानें आला पाशीं ॥१॥ संतोष तो कांहीं बोलवेना वाचे । उदार प्रेमाचें झळंबती ॥२॥ अंकीं बैसवितां कैसा तो शोभला । कोंदण रत्नाला जयापरी ॥३॥ चुंबोनियां मुख पुसतो मंजूळ । मी कोण तें न कळे तुज कांहीं ॥४॥ तो म्हणे आहेसी तात तूं निष्ठुर । आम्हांसी बाहेर ठेवियेलें ॥५॥ राजा म्हणे काय जाहालें तयासी । होसी तूं राज्यासी अधिकारी ॥६॥ नाम म्हणे ऐसा दोघांचा उद्नार । लोटों आला पूर आनंदाचा ॥७॥