भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओढळातें सुणें बैसे विहिरणी । तेथें काय गुणी प्रगटेल

odhalaten sunen baise vihirani | tethen kay guni pragatel

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ओढळातें सुणें बैसे विहिरणी । तेथें काय गुणी प्रगटेल ॥१॥ देव खादलें ते काय करी जाणा । सर्व अवगुण तयापासीं ॥२॥ अवघीं संतति कावळे पोशिले । जावोनि बैसले विष्टेवरी ॥३॥ भुजंगाचे मुखीं अमृत घातलें । फिरोनि पाहिलें विषयम ॥४॥ नामा ह्मणे ऐसे अभक्त निर्लज्ज । त्यांसि केशिराज उपेक्षील ॥५॥