भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति पुसत । कोठें होते पंढरिनाथ

nivrutti pusat | kothen hote pandharinath

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति पुसत । कोठें होते पंढरिनाथ ॥१॥ खूण कळली हषिकेशी । सांगोंनको निवृत्तीसी ॥२॥ उत्तर दिलें ज्ञानदेवें । नवल केवढें सांगावें ॥३॥ शिव वंदी पायवणी । नौये योगियांचे ध्यानीं ॥४॥ द्वारीं उभे उभे ब्रम्हादिक । गुण गाती सकळिक ॥५॥ जनीसवें दळी देव । तिचा देखोनियां भाव ॥६॥