भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्विकल्प निराकारू । नि:शून्य निराधारू । निर्गुण अपरंपारु । चिदानंद सांबळें

nirvikalpa nirakaru | ni:shunya niradharu | nirgun aparamparu | chidanand sambalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निर्विकल्प निराकारू । नि:शून्य निराधारू । निर्गुण अपरंपारु । चिदानंद सांबळें ॥१॥ तया पुंडलिकासाठीं । येऊनि उभें वाळवंटीं । दोन्ही कर ठेवुनि कटीं । प्रसन्न दृष्टि पाहातसे ॥२॥ ह्मणऊनि उठा घ्यारे वाट । ठाका पंढरी वैकुंठ । येर वावगे काय रे कष्ट । ब्रह्मी भेट पंढरीये ॥३॥ मूळप्राम मायापुर । पडिले भूत ग्रामा-चार । ह्मणऊनि कर जघनावर । उभा राहूनि दावितसे ॥४॥ वि-ठ्ठल नाम ह्लदयीं धरा । हाचि उतार पैलपारा । मग नाहीं येरझारा । शंभु कुमार सांगतसे ॥५॥ भेटी चौघे मुरडले । अठरा धांवतां भागले । पंथीं साहि भांडले । ते अद्यापि बुझले नाहीं ॥६॥ जो सहस्त्रा माजी न दिसे । चोविसांत न भासे । दो सहस्र अनारिसे । पाहतां अरे न दिसेचि ॥७॥ लयलक्ष लावूनि समाधि । योगियां होचि उपाधि । उघडा डोळा प्रेमपदीं । रे विठोजी न्याहाळा ॥८॥ येर वाउगि खटपट । ठाका पंढरी वाळुवंट । हरूनि मनुष्यपण दृष्ट । चतुर्भुज करिल ॥९॥ जना ऐहिक पाहारे हित । हें पंढरीचें कुळदैवत । येर वाउगे खेचर भूत । रे संगीत चित्रिंचें ॥१०॥ पूर्वज उद्धरावयाचि चाडु । तरी वेणुनादीं जेवण करा गोडु । कोटि-कुळें उद्धरती तुमच्या सुरवाडु । रे पावाल कैवल्य ॥११॥ धन्य धन्य तो संसारीं । जेणें देखिली पंढरी । जेणें सप्रेम होऊनि महाद्वारीं । लोटांगण घातलें ॥१२॥ केलें चंद्रभागे स्नान । आणि संतचरणीं दर्शन । नामघोषें निवे मन । समाधान जीवासी ॥१३॥ पंढरी हे वैकुंठ भुवन । म्हणऊनि करीं कांरे दरुषन । मग नाहीं आया गमन । रे सुरगण वंदिती ॥१४॥ भुक्ति मुक्तिचा दातारू । तो हा वोळगा सारंगधरू । नामया स्वामीचा दातारू । रुक्मादेवीवरु पंढरीये ॥१५॥