भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्विकल्प ब्रह्म कशानें आतुडें । जंववरी न मोडे मी तूं पण

nirvikalpa brahma kashanen atuden | janvavari na mode mi tun pan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निर्विकल्प ब्रह्म कशानें आतुडें । जंववरी न मोडे मी तूं पण ॥१॥ शब्द चित्रकथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं निश्चळ हरिच्या पायीं ॥२॥ अणूच्या प्रमाण होतां दुजेपण । मेरूच्या स-मान भार देवा ॥३॥ नामा ह्मणे ब्रह्म सर्वांभूतीं पाहीं । तरींच ठायींच्या ठायीं निवसी बापा ॥४॥