भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरोप हा माझा सांगरे कृष्णाला । भरंवसा मजला आहे तुझा

nirop ha majha sangare krushnala | bharanvasa majala ahe tujha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निरोप हा माझा सांगरे कृष्णाला । भरंवसा मजला आहे तुझा ॥१॥ अच्युता अनंता श्रीधरा वामना । अगा नारा-यणा शरण तुज ॥२॥ जनार्दन हरि त्रिविक्रम केशवा । अगा वासुदेवा शरण तुज ॥३॥ गोविंदा माधवा अगा मेघ: शामा । अगा पुरुषोत्तमा शरण तुज ॥४॥ चक्रपाणी अगा वैकुंठनायका । रक्षी या बाळका दासा तुझ्या ॥५॥ त्रिविधतापें माझी जळतसे काया । दावीं मज पायां एक वेळां ॥६॥ विदुर अक्रूर करिती समाधान । करावें श्रवण नामा म्हणे ॥७॥