भजनी मालिका
← भजनांकडे परत

निद्रिस्थ सकळ तये वनीं व्याळ । गिळितसे बळें नंदालागीं

nidristha sakal taye vanin vyal | gilitase balen nandalagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निद्रिस्थ सकळ तये वनीं व्याळ । गिळितसे बळें नंदालागीं ॥१॥ कृष्णा धांव वेगीं मज गिळी सर्प । काळावरी दर्प तुझा देवा ॥२॥ माझिया पाडसा येईंरे धांवोन । दाखवीं वदन अंतकाळीं ॥३॥ आली काय तुज निद्रारे कान्हया । माझिया तान्हया ऊठ वेगीं ॥४॥ ऐकोनियां ऐसें बोलती सकळ । घालिती मुसळ सर्पावरी ॥५॥ श्रमले सकळ सोडिना नंदाला । पिटी वक्ष-स्थळा नंदपत्नीं ॥६॥ उठे जगद्‍गुरु काय झालें माय । लवितसे पाय तयालागीं ॥७॥ टाकियेलें तेव्हां सर्पें कलेवर । पुरुष सुंदर दिसतसे ॥८॥ नामा ह्मणे वाचे स्तवी विश्वंभरा । करूनि नम-स्कारा जाता झाला ॥९॥