भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेत्रीं अश्रुधारा पडती अपार । तेणें पृथ्वीवर पूर ताहे

netrin ashrudhara padati apar | tenen pruthvivar pur tahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नेत्रीं अश्रुधारा पडती अपार । तेणें पृथ्वीवर पूर ताहे ॥१॥ ह्मणे तुह्यांवीण कैसा प्राण धरूं । वांचुनियां करूं काय आतां ॥२॥ माझिया भारानें दाटेल मेदिनी । तुह्मां आव्हेरूनि गेल्यें जरी ॥३॥ सुखाचे सांगाती होतों दोघीजाणी । दु:ख ह्मणवूनि सांडी केली ॥४॥ सांडिलिया तुह्मां देवा न मानेल । वेदशास्त्र बोल हाकारिती ॥५॥ तुजविण क्षण कंथवेना काळ । मीना जैसें जळ तैसेम आह्मा ॥६॥ तुज-विण जिणें व्यर्थ या संसारीं । नामा ह्मणे खरी गोष्ट बोले ॥७॥