भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाथा नको रे अंतरूं । तुझ्या कांसेचें वासरूं

natha nako re antarun | tujhya kansechen vasarun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाथा नको रे अंतरूं । तुझ्या कांसेचें वासरूं ॥१॥ कळा दुभती तूं गाय । तुझा वियोग असह्य ॥२॥ देह भोगितां प्राक्तन । मना ठेवी तयाधीन ॥३॥ ज्ञानदेवीं ही समाधी । जडो मनोवृत्ति अवघी ॥४॥ नामा भेटे ज्ञानदेवा । जनां प्रसाद मिळावा ॥५॥