भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाशवंत देतां ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा पुराणांत

nashavant detan brahma yeil hatan | aisi jyachi katha puranant

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाशवंत देतां ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा पुराणांत ॥१॥ सद्‌‍गुरुचे पायीं देहासि अर्पितां । तात्काळ मुक्तता हातां येते ॥२॥ माया देऊनियां ब्रह्म घ्यावें हातीं । ऐशा गुरूप्रति कां भजाना ॥३॥ नामा म्हणे गुरूपायीं लाभ आहे । मोक्ष तोही पाहे दास होतो ॥४॥