भजनी मालिका
← भजनांकडे परत

नारायण नाम तारक सर्वांसी । तें मुनीं मानसीं धरिलें असें

narayan nam tarak sarvansi | ten munin manasin dharilen asen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नारायण नाम तारक सर्वांसी । तें मुनीं मानसीं धरिलें असें ॥१॥ कापुराची राशी अग्नीचाहो कण । तैसें नाम जाण पातकासी ॥२॥ अंतरीं ते क्षुधा लागली द्विजासी । पाहीन नगरीसी सावचीत ॥३॥ नामा म्हणे द्विज उभा महाद्वारीं । केवळ भिकारी राजयोगी ॥४॥