भजनी मालिका
← भजनांकडे परत

नारदें पाहिली बाळकाची स्थिती । त्याच्या चित्तीं शांती भरली दिसे

naraden pahili balakachi sthiti | tyachya chittin shanti bharali dise

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नारदें पाहिली बाळकाची स्थिती । त्याच्या चित्तीं शांती भरली दिसे ॥१॥ कल्पनेचा दाणा म्हणे तयालागीं । बाळा कवणालागीं आठविसी ॥२॥ वय तरी थोडें भावना उदंड । काय तुज चाड सांग आतां ॥३॥ न बोलसी तरी साधेना हें काज । अंतरींचें नीज मज कळे ॥४॥ आला लाभ काळ फळलीसे भावना । उघडोनी लोचना पाहीं मज ॥५॥ ऐकोनी ध्रुवानें सज्जनाची वाणी । नेत्र विकासोनी पाहे तदा ॥६॥ पुढें उभा मुनि लावण्याचा गाभा । आपुलिया लाभालागीं नाचे ॥७॥ नामा म्हणे ध्रुवें वंदिले चरण । बोलिलें वचन ऐका आतां ॥८॥