भजनी मालिका
← भजनांकडे परत

नारा महादा गोंदा विठा जाले विकळ । झांकियेली शीळ समाधीची

nara mahada gonda vitha jale vikal | jhankiyeli shil samadhichi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नारा महादा गोंदा विठा जाले विकळ । झांकियेली शीळ समाधीची ॥१॥ गंधर्व आणि देव चिंतावले भारी । दीर्घध्वनि करी नारा विठा ॥२॥ गोंदा आणि महादा सांडिती शरीर । विसोबा खेचर फार कष्टी ॥३॥ लोपलासे भानु पडला अंधार । गेला योगेश्वर निवृत्तिराज ॥४॥ गेल्या त्या विभूति अनादि अवतार । आतां देवा फार आठवतें ॥५॥ नामा म्हणे हरि धरवेना धीर । येती गहिंवर वोसंडोनी ॥६॥