भजनी मालिका
← भजनांकडे परत

नंदालागीं तेव्हां ह्मणे चक्रपाणी । जावें तुह्मीं सकळांनी गोकुळासी

nandalagin tevhan hmane chakrapani | javen tuhmin sakalanni gokulasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नंदालागीं तेव्हां ह्मणे चक्रपाणी । जावें तुह्मीं सकळांनी गोकुळासी ॥१॥ अहर्निशीं माझें करावें चिंतना । दु:ख सांडी मना नंदराया ॥२॥ ऐसें ऐकोनियां निराश वचन । जाईल माझा प्राण तुजविण ॥३॥ गडी ह्मणती देवा आह्मांसी टाकिलें । काय आमुचें सरलें पुण्य देवा ॥४॥ कोणासवें आह्मीं खेळूं यमुनेंत । र-क्षील आम्हांतें कोण आतां ॥५॥ ब्रह्मादिक तुझ्या वंदिताती पायां । दिल्या आम्ही शिव्या क्षमा करीं ॥६॥ यशोदेसी सांगा माझा नम-स्कार । देईन सत्वर भेटी सर्वां ॥७॥ कंठ सद्नदीत नेत्रीं अश्रुपात । निघती समस्त नामा ह्मणे ॥८॥