भजनी मालिका
← भजनांकडे परत

नानापरी मन आवरितों भारी । कांही केल्या हरि विसर न पडे

nanapari man avariton bhari | kanhi kelya hari visar na pade

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नानापरी मन आवरितों भारी । कांही केल्या हरि विसर न पडे ॥१॥ दृश्यादृश्याच्या दूर केल्या गोष्टी । उघडिली दृष्टि ज्ञानदेवें ॥२॥ गीतेवरी टीका ग्रंथ केला सार । केवळ ईश्वर ज्ञानाचा हा ॥३॥ नामा म्हणे आतां देहासी विटला । स्वरुपीं पालटला ज्ञानदेव ॥४॥