भजनी मालिका
← भजनांकडे परत

नानापरी खेद आठविती मना । आतां नारायणा सिद्धि न्यावें

nanapari khed athaviti mana | atan narayana siddhi nyaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नानापरी खेद आठविती मना । आतां नारायणा सिद्धि न्यावें ॥१॥ समाधीसी केली आरति पंचारती । राहिली निवृत्ति स्वरूपीं तुझ्या ॥२॥ सुखाचें साधन जालीं चौघेजणें । केलीं नारायणें बोळवण ॥३॥ पंचक्रोशावरी उभे ठेले भार । केला नमस्कार समाधीसी ॥४॥ नामा म्हणे आतां जावें पंढरपुरा । समाधीचा सारा विधि जाला ॥५॥