भजनी मालिका
← भजनांकडे परत

नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केबीं पावती ब्रम्हासुख

namratevin yogyata miraviti | te kebin pavati bramhasukh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केबीं पावती ब्रम्हासुख ॥१॥ लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवीं पावती केशवातें ॥२॥ एक संत म्हणविती नग्न पैं हिंडती । अंतरींची स्थिति खडबड ॥३॥ झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ॥४॥ सागरीं गंगा मिळोनि गेली जैसी । परतोनि तियेसी नाम नाहीं ॥५॥ नामयाची जनी निर्गुणीं बोधिली । ठेवा जो लाधली पांडुरंग ॥६॥