भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामें तरूं अवघे जन । यमपुरीं घालूं वाण

namen tarun avaghe jan | yamapurin ghalun van

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामें तरूं अवघे जन । यमपुरीं घालूं वाण ॥१॥ करूं हरिनामकीर्तना । तोडूं देहाचें बंधन ॥२॥ करूं हरिनामाचा घोष । कुंभपाक पाडूं ओस ॥३॥ ऐस नामा यशवंत । विठोबाचा शरणागत ॥४॥