भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । ऐसेम बोले वाणी वेदशास्त्रीं

namaparata mantra nahin tribhuvanin | aisem bole vani vedashastrin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । ऐसेम बोले वाणी वेदशास्त्रीं ॥१॥ पहा विचारोनि अनुभव तो मनीं । नका आडरानीं झणीं भरो ॥२॥ नामाविणे कोणी तरले जे म्हणति । ते आधीं बुडती भवसागरीं ॥३॥ नामा म्हणे नाम ॐकाराचें मूळ । ब्रह्म तें केवळ विटेवरी ॥४॥