भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमन करीन द्वारकानायका । पांडव पालका देवराया

naman karin dvarakanayaka | pandav palaka devaraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नमन करीन द्वारकानायका । पांडव पालका देवराया ॥१॥ आतां मी गाईन गुण नाम कीर्ति । जेणें चारी मुक्ति दासी होती ॥२॥ साधक लोकांसी हेंचि पैं साधन । ब्रह्म सनातन वश होय ॥३॥ नामा म्हणे सर्व सारांचें हें सार । जेणें निरंतर निरंतर सुख वाटे ॥४॥