भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचा महिमा कोण जाणे सीमा । चतुर्मुख ब्रह्मा-नेणे कांहीं

namacha mahima kon jane sima | chaturmukh brahma-nene kanhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामाचा महिमा कोण जाणे सीमा । चतुर्मुख ब्रह्मा-नेणे कांहीं ॥१॥ संसारा आलिया हेचि आहे जोडी । अखंड घ्यावी गोडी हरिनामें ॥२॥ सहस्त्रमुखें शेष वाखाणितां कीर्ती । नाहीं तया तृप्ति आजीवरी ॥३॥ पशु पक्षी तृण कीटक अपार । नामें गेले पार उतरोनि ॥४॥ कापुराचे राशी पडे अग्निकण । तैसें नाम जाण पातकासी ॥५॥ नामाग्नीनें दोष जळती एकसरा । कैवल्य जे धरा बसल्या ठायीं ॥६॥ नामा म्हने धन्य नामाचा प्रताप । ध्याती एकरूप देवभक्त ॥७॥