भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचा गजर गर्जे भीमातीर । महिमा साजे थोर तुज एका

namacha gajar garje bhimatir | mahima saje thor tuj eka

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामाचा गजर गर्जे भीमातीर । महिमा साजे थोर तुज एका ॥१॥ सिद्धि सिद्धि दासी अंगन झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ती चारी ॥२॥ चारी वेद भाट होऊनि गर्जती । सन-कादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥ सुरवरांचे भार अंगणीं लोळती । चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥ नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू । करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥