भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा सिंपे नामा सिंपे । रोप लाविलें केशवबापें

nama simpe nama simpe | rop lavilen keshavabapen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामा सिंपे नामा सिंपे । रोप लाविलें केशवबापें ॥१॥ येक उगवली आरडी दरडी । येक वाळुनी जाली कोरडी ॥२॥ येक पुष्प फळासि आली । येक कळींच निर्फळ जाली ॥३॥ नामा पुष्प केशव द्वारीं । न माये आंत बाहेरी ॥४॥