भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा म्हणे माते ऐक वो वचना । मी गेलों दर्शाना नागनाथा

nama mhane mate aik vo vachana | mi gelon darshana naganatha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामा म्हणे माते ऐक वो वचना । मी गेलों दर्शाना नागनाथा ॥१॥ आंवढया देउळीं जाहला संचार । पारुषला धीर या देहाचा ॥२॥ तैंहूनि तुज मज तुटला संबंधु । विठ्ठलाचा छंदु घेतला जीवीं ॥३॥ लौकिक व्यवहार नाठवेचि कांहीं । कल्पना ते देहीं आथीचना ॥४॥ टाळ दिंडी घेऊनि नाचतो रंगणीं । तेणें माझ्या मनीं सुख वाटे ॥५॥ या देहघरसंसाराचा आलासे कंटाळा । म्हणोनि गोपाळा शरण आलों ॥६॥ पुत्र कलत्र येथें कायसी बापुडीं । जेणें रौरव कुंडीं वासा घडे ॥७॥ तूं जरी म्हणसी हें सत्य संसारसुख । तरी हें केवळ विख विस्तारलें ॥८॥ तेचि हें जाण महणोनि टाकियलें दुरी । तैं सेवितां उरीं कैंची माते ॥९॥ म्हाणोनि मी जालों या संतांचा दीन । तेणें हरिला सीण जन्मांतरीचा ॥१०॥ नामा म्हणे आतां मी-तूंपण कैंचें । मी या विठोबाचें शरणागत ॥११॥