भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम वाचे उच्चारितां । हरे संसाराची व्यथा

nam vache uchcharitan | hare sansarachi vyatha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम वाचे उच्चारितां । हरे संसाराची व्यथा । जाती दोषाचिया चळथा । रामकृष्ण उच्चारणीं ॥१॥ हरी माधव गोविंद । याची नामाचा जया छंद । तोचि पावेल परमपद । निजभुवन वैकुंठीं ॥२॥ जन्मजन्माची तपरासी । तेणें नाम आलें मुखासी । स्मरतां हरी ह्रषिकेशी । सकळ पूर्वजां उद्धार ॥३॥ नामा जपे ध्यानीं मनीं । अखंड विठ्ठल हरी कीर्तनीं । तेणें जपें ये मेदिनी । कोटी यज्ञ घडले ॥४॥