भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तारी पतितासी । ते कां अव्हेरी भक्तांसी

nam tari patitasi | te kan avheri bhaktansi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम तारी पतितासी । ते कां अव्हेरी भक्तांसी ॥१॥ प्रेमळ देवा चें लडिवाळ । करी निजांगें प्रतिपाळ ॥१॥ सेवाऋणें वागवी भार । जन्मोजन्मींचा दातार ॥२॥ स्वामि स्वये अंगिकारी । वोळगा कांहो दारोदारीं ॥३॥ निष्ठुर नव्हे कोणेकाळीं । कृपाकटाक्षें कुरवाळी ॥४॥ दास विठा म्हणे वेगें । यात्ने जावें माझें संगें ॥५॥