भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम घेताम भगवंताचें । पाश तुटती भवाचे

nam ghetam bhagavantachen | pash tutati bhavache

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम घेताम भगवंताचें । पाश तुटती भवाचे ॥१॥ जे जे नामीं रत जाले । ते ते केशवीम तारिले ॥२॥ गणिका दुराचारी । नामें तारिली अहिल्या नारी ॥३॥ महापापी अजामेळ । तोही तारिला चांडाळ ॥४॥ नामें गजेंद्र तारिला । देवें मोक्षपदासी नेला ॥५॥ नाम घेतसे पांचाळी । उभा बाप वनमाळी ॥६॥ नामा सांगे भाविकंसी । नाम घ्यारे अहर्निशीं ॥७॥