भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको गा मोकलूं दीना पंढरिनाथा । तुजविण आतां कोण पावे

nako ga mokalun dina pandharinatha | tujavin atan kon pave

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नको गा मोकलूं दीना पंढरिनाथा । तुजविण आतां कोण पावे ॥१॥ अपराधाच्या पोटीं पाहूं नको कांहीं । ये गे विठाबाई झडकरी ॥२॥ माझ्या दोषासाठीं पाठमोरा होसी । पावन ब्रीदासी लागे बोल ॥३॥ नामा म्हणे जननी तूंचि चराचर । तारिले अपार जड जीव ॥४॥