भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं आमुचे दैवीं त्याणें कोठोनी द्यावें । व्यर्थ कां रुसावें देवावरी

nahin amuche daivin tyanen kothoni dyaven | vyartha kan rusaven devavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाहीं आमुचे दैवीं त्याणें कोठोनी द्यावें । व्यर्थ कां रुसावें देवावरी ॥१॥ न करितां खेद पुढें वाट चाले । गौरक्षक भेटले तयालागीं ॥२॥ पुसतसे त्यासी कोणाचें नगर । ते म्हणती घर सुदाम्याचें ॥३॥ सुदाम्याची तुम्ही हेळणा करितां । तयाच्या संचीता प्राप्त कैचें ॥४॥ मानुनी असार नगरद्वारा गेला । प्रचीती तयाला नयेचि ते ॥५॥ जेव्हां वेत्नधारी मजुरा करिती । चरणासी लागती सुदाम्याच्या ॥६॥ सुदामदेव तेव्हां मंदिरासी गेला । मग ओंवाळिला सुंदरीनें ॥७॥ समाधानी झाला सुदामा ब्राम्हण । करारे कीर्तन नामा म्हणे ॥८॥