भजनी मालिका
← भजनांकडे परत

नागवे कळिकाळां ब्रिदावळी पाही । तोचि लव-लाहीं ध्यायिजेसु

nagave kalikalan bridavali pahi | tochi lav-lahin dhyayijesu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नागवे कळिकाळां ब्रिदावळी पाही । तोचि लव-लाहीं ध्यायिजेसु ॥१॥ स्मरण विठ्ठल चित्त पांडुरंग । नाहीं तया मग जन्ममरण ॥२॥ आपणचि नांदे भक्तांचिया घरीं । आपणचि करी सर्व कृत्य ॥३॥ नामा ह्मणे तो देव पंढरीनिवास । कळिका-ळासी वास पाहों नेदी ॥४॥